या बिअर शॉपवाल्याच्या सोशल डिस्टेंसिंगच्या देशी जुगाडावर आनंद महिंद्रा फिदा, शेअर केला व्हिडीओ

देशात लॉकडाऊन असताना देखील दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात देखील दारुच्या दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा लागत आहेत. दुकानांबाहेर सोशल डिस्टेंसिंग पाळण्यासाठी काही नियम देखील केले जात आहेत. दुकान यासाठी भन्नाट शक्कल लढवत आहेत. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक व्यक्ती बियर शॉपच्या बाहेर उभा आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे दुकानदाराने असा जुगाड केला आहे की ग्राहकाच्या संपर्कात न येता पैसे आणि सामानाची देवाण-घेवाण करता येते. दुकानदाराने काउंटरपासून एक लांब पाईप जोडला आहे. या पाईपाद्वारे वस्तू आणि पैसे दिले घेतले जात आहेत.

आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे. जे कॉन्टॅक्टलेस स्टोरफ्रंट डिझाईनला प्रोत्साहन देते.

सोशल मीडियावर हा भन्नाट जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले असून, अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment