आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सरकारने लाँच केले ‘आरोग्यपथ’ पोर्टल

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात केंद्राने हेल्थकेअर सप्लाय चेन पोर्टल ‘आरोग्यपथ’ लाँच केले आहे. उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना त्वरित अत्यावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चने (सीएसआयआ) 12 जूनला हे पोर्टल लाँच केले आहे. औषधापासून ते पीपीई किटपर्यंत अनेक सेवा या पोर्टलवर मिळतील.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू ओळखणे आणि पुरवठादारांपर्यंत पोहचणाऱ्या वस्तूंची माहिती मिळेल. याशिवाय उत्पादक आणि पुरवठादार जवळील पॅथोलॉजिकल लॅब्रोटरी, मेडिकल स्टोर्स आणि हॉस्पिटल इत्यादींद्वारे ग्राहकांना मदत पोहचवतील.

सीएसआयआरला आशा आहे की या पोर्टलद्वारे लोकांपर्यंत पोहचणाऱ्या आरोग्य सेवेसाठी लागणारा वेळ कमी होईल. याद्वारे ग्राहकाची मागणी व नवीन उत्पादनांमुळे व्यवसायाची संधी देखील वाढेल.

Leave a Comment