असे आहेत  पंच्याहत्तरीत पदार्पण केलेले डोनाल्ड ट्रम्प 

फोटो साभार झी न्यूज

आपल्या वादग्रस्त विधानांनी मित्रांपेक्षा शत्रू अधिक असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी १४ जून रोजी वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केले असून अध्यक्षपदाची दुसरी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. यावेळी त्यांना कदाचित विजयाची खात्री वाटत नसल्याने त्यांनी अगोदरच माझा पराभव हे अमेरिकेचे मोठे नुकसान असेल असे जाहीर करून टाकले आहे. अमेरिकेच्या या ४५ व्या अध्यक्षांची बेबंद विधाने करण्याबाबत मोठी ख्याती आहे आणि त्यांच्या अनेक सवयींची माध्यमातून नेहमीच टर उडविली जाते.

त्यातील एक म्हणजे ट्रम्प यांना हस्तांदोलन करणे आवडत नाही. अगदी नाईलाज असेल तर ते वेगळीच पद्दत वापरतात. ज्याच्याशी हस्तांदोलन करायचे त्याचा हात ते खेचतात. त्यांची तीन लग्ने, त्यांची मुले, त्यांचा व्यवसाय, श्रीमंती याचबरोबर त्यांची हेअरस्टाईल नेहमी चर्चेत असते. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, माझे केस झोपेतून उठल्यासारखे दिसतात त्यामुळे ते अगोदर हेअरड्रायरने केस पुढे घेतात आणि मग मागे वळवितात.

p

फोटो साभार न्युयॉर्क टीव्ही

ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ साली श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील रिअल इस्टेट व्यावसायिक होते. ट्रम्प यांनीही हाच व्यवसाय करून यशाची कमान उभी केली. ४०० कोटी डॉलर्सची संपत्ती मिळविली. ट्रम्प याच नावाने त्यांनी अनेक कॅसिनो, गोल्फ क्लब, हॉटेल्स, रहिवासी इमारती बांधल्या आहेत. विशेष म्हणजे २००४ ते २०१५ या काळात त्यांनी टीव्ही प्रेझेंटर म्हणूनही रिअलिटी शो होस्ट केले आहेत.

ट्रम्प यांनी तीन लग्ने केली. त्यातून त्यांना पाच मुले आहेत. पहिली पत्नी इवाना ऑलिम्पिक खेळाडू होती. तिला तीन मुले आहेत. १९९० मध्ये ट्रम्प यांनी आयुष्यातला सर्वात खडतर काळ काढला. या काळात ते कंगाल होण्याच्या पायरीवर पोहोचले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या अनेक मालमत्ता विकाव्या लागल्या होत्या. मात्र या परिस्थितीवर मात करून त्यांनी पुन्हा एकदा यश मिळविले.

अमेरिकेचे राष्ट्रपती बनले त्यावेळी ते स्वतःच्या मालकीच्या ९० मजली ट्रम्प टॉवर मध्ये राहत होते आणि अध्यक्ष बनल्यावरही त्यांना याच घरात राहायचे होते. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना व्हाईट हाउस मध्ये यावे लागले असे सांगितले जाते.

Leave a Comment