२१ जून रोजी होणार जगाचा शेवट?

फोटो साभार ट्वीक टाऊन

जगभरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु असतानाच एक हादरवून टाकणारा दावा समोर आला आहे. येत्या २१ जूनला जगाचा शेवट होणार असल्याचे सांगितले जात असून याचा अर्थ २१ जून हा जगाचा शेवटचा दिवस असेल. हा दावा अतिप्राचीन माया कॅलेंडरवर आधारित आहे. आज जगभरात सर्वत्र ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार कालगणना केली जात असली तरी हे कॅलेंडर १५८२ साली अस्तित्वात आले आहे.

त्यापूर्वीही कालगणना केली जात होती आणि ती प्रामुख्याने माया संस्कृती काळात तयार केलेल्या माया कॅलेंडरवरून तसेच त्या नंतर आलेल्या ज्युलियन कॅलेंडरवरून केली जात होती. अन्य अनेक कॅलेंडर त्या काळातही होती पण ही दोन विशेष प्रसिद्ध होती.

ग्रेगोरियन कॅलेंडरमुळे पृथ्वी सुर्वाभोवती फिरते याची वेळ अधिक चांगल्याप्रकारे समजू शकते. पण या क्षेत्रातील अनेक तज्ञ असेही म्हणतात की ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये ११ दिवस कमी मोजले गेले आहेत. माया आणि ज्युलियन कॅलेंडरमध्ये वर्षाचे दिवस सध्याच्या वर्षापेक्षा ११ दिवसांनी अधिक होते. वैज्ञानिक पाउलो टागालोगलुन यांनी या संदर्भात ट्विटर वरून पोस्ट करून ती नंतर डीलीट केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ज्युलियन कॅलेंडर मधील सन २०१२ म्हणजे आताच्या ग्रेगोरियन कॅलेंडर मधील २०२० साल आहे. ज्युलियन कॅलेंडर २६८ वर्षे जुने आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाचे त्यातून वगळलेले ११ दिवस त्यात धरले तर ती ८ वर्षे होतात. म्हणजेच ज्युलिअन कॅलेंडर नुसार २१ जून २०१२ हे आजचे २१ जून २०२० आहे.

यापूर्वी २०१२ मध्ये जगाचा विनाश होणार अश्या प्रकारच्या अनेक बातम्या आल्या होत्या. पण ती तारीख ज्युलिअन कॅलेंडरप्रमाणे धरली गेली होती. ती ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे २१ जून २०२० अशी आहे असे या तज्ञांचे म्हणणे आहे.