हिमाचल मध्ये शुटींगसाठी बॉलीवूड प्रतीक्षेत

फोटो साभार अमर उजाला

अनलॉक वन लागू झाल्यावर हिमाचल मध्ये शुटींग करता यावे यासाठी बॉलीवूड मधील नामवंत २५ प्रोडक्शन हाउस प्रयत्नशील आहे. त्यासाठी हिमाचल फिल्म कॉओर्डीनेटर व लाईन प्रोड्यूसर् बरोबर निर्माते संपर्क साधून आहेत. चित्रपट, जाहिराती आणि वेबसिरीज शुटींगसाठी हिमाचलला पहिली पसंती दिली जात आहे. पंजाब, कोलकाता, महाराराष्ट्रात इनडोर शुटींग साठी परवानगी दिली गेली असली तरी आउट डोर शुटींग साठी पहिली पसंती हिमाचल आहे असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार धर्मा, राजश्री, शिवाय एमएक्स प्लेयर, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, बूट यासारख्या वेबसिरीज निर्मात्या कंपन्या सिमला, मनाली, कानौर, लाहोल स्पिती येथे शुटींग करण्यासाठी उत्सुक आहेत. हा भाग ग्रीन झोन मध्ये असल्याने सुरक्षित असल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे.

फक्त पाच लोकांना घेऊन येण्याची परवानगी मिळाली तरी निर्माते हिमाचल मध्ये जाण्यास तयार आहेत असे समजते. अभिनेता, दिग्दर्शक, कॅमेरामन, निर्माता याना परवानगी दिली तरी ज्युनिअर कलाकार, अन्य सहयोगी स्टाफ साठी स्थानिक लोकांची सेवा घेण्याची तयारी त्यांनी दाखविली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment