व्हायरस असूनही चवीने खाल्ली जाणारी निळी अंडी

फोटो साभार फूड बीस्ट

अंडी हा जगभरातील अनेक लोकांचा नाश्त्याचा महत्वाचा भाग असतो. अनेक पक्षांची अंडी विविध ठिकाणी खाल्ली जात असली तरी बहुदा सर्वाधिक अंडी खाल्ली जातात ती कोंबडीची. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेली कोंबडीची अंडी अधिक प्रमाणात पांढऱ्या रंगाची किंवा बिस्कीट रंगाची असतात. कडकनाथ कोंबडीची अंडी काळ्या रंगाची असतात असे म्हणतात. अर्थात ही अंडी खूप महाग आणि सहजी मिळणारी नाहीत. चिले देशात ऑरकाना जातीच्या कोंबड्या चक्क निळ्या रंगाची अंडी देतात.

सर्वप्रथम ही कोंबडी १९१४ मध्ये स्पेन मधील पक्षीतज्ञ साल्व्हाडोर कॅस्तेलो यांना आढळली. ती चीलेच्या ऑरकाना भागात दिसली त्यावरून तिला तेच नाव दिले गेले. घरगुती कोंबडीची ही जात. तिची अंडी निळी होण्यामागे एक विषाणू कारणीभूत आहे. रेट्रोव्हायरस हा विषाणू या कोंबडीवर हल्ला करतो. हा सिंगल आरएनए विषाणू असून तो कोंबडीच्या शरीरात प्रवेश केल्यावर तो कोंबडी मधील जनुक रचना बदलतो. या विषाणूला EAV-HP असे नाव आहे.

कोंबडीमधील जनुकीय रचना बदलल्यामुळे अंड्यांचा रंग बदलून निळा होतो. अर्थात या विषाणूपासून माणसाला काहीही धोका नसतो. शिवाय अंड्यांचे बाहेरचे कवच फक्त निळे होते आणि आतील बलक नेहमीच्या रंगाचाच असतो. युरोपियन, अमेरिका देशात या कोंबडीचे मांस आणि अंडी अतिशय चवीने आणि आवडीने खाल्ली जातात. त्यामुळे त्यांना चांगली मागणी येते. या अंड्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते असेही सांगितले जाते.

Leave a Comment