सुशांत सिंह राजपुतला सर्वच क्षेत्रातून वाहण्यात आली श्रद्धांजली


मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत माहिती पोलिसांना त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने दिल्याचे सांगितले जात आहे. सुशांत सिंग राजपूत हा ३४ वर्षांचा होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. ‘काइ पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याला या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. त्याच्या अचानक एक्झिटमुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांत सर्वच क्षेत्रातुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Leave a Comment