जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 80 लाखांच्या टप्प्यावर


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचे थैमान अद्याप कायम असून जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 78 लाखांहून अधिक झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत चार लाख 27 हजार नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मागील 24 तासात जगभरात 2 लाख 76 हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसची जगभरात 78 लाख 59 हजार लोकांना लागण झाली असून 4 लाख 32 हजारांवर आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या पोहोचली आहे. त्याचबरोबर जगभरातील 40 लाख 36 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. केवळ 8 देशांमध्येच जगातील 60 टक्के कोरोनाबाधित आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या घरात आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारतात कोरोनाचे 3,21,626 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 9,199 लोकांचा बळी गेला आहे. सध्या भारतात 1,50,101 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 1,62,326 जणांना उपचारनंतर घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका जगात अमेरिकेला बसला असून 21,42,224 जणांना अमेरिकेत कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 1,17,527 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 8,50,796 कोरोनाबाधित आहेत तर 42,791 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41,662 लोकांचा यूकेत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,94,375 एवढी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,301 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,36,651 हजार एवढा आहे.

अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु हे आठ देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे.

Leave a Comment