सुशांतने आईसाठी लिहिली अखेरची पोस्ट आली चर्चेत


लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आज मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर त्याच्या निधनाच्या माहितीनंतर शोककळा पसरली आहे. पण त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला? हे अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही. पण त्याची अखेरची पोस्ट त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर चर्चेत आली आहे.


दरम्यान नैराश्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले जात असून त्याच्या मनात आत्महत्या करण्यापूर्वी नेमके काय विचार सुरु होते हे सांगणे कठीण आहे. पण त्याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतने काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये माँ असे लिहिले होते. त्याच्या निधनानंतर त्याची ही पोस्ट सध्या चर्चिली जात आहे.

Leave a Comment