सुशांतने खरेदी केला होता चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा… पण…


हिंदी सिनेसृष्टीत आपले भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपुतने मुंबईत आपल्या हक्काचे आलिशान घर घेतले होते. पण त्याने चंद्रावर देखील जमीन विकत घेतली होती याची तुम्हाला माहित आहे का? होय, हे खरे आहे. सुशांतने चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा सुशांतने विकत घेतला होता आणि त्याचे याच ठिकाणी जाण्याचे स्वप्न होते. पण त्याच्या अशा अचानक एक्झिटमुळे ते स्वप्न स्वप्नच बनून राहिले.

दिल्लीतील टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीमधून बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणाऱ्या सुशांत सिंह राजपुतने मॅकेनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले होते. त्याला या युनिव्हर्सिटीच्या एंटरन्स एग्झाममध्ये 7 वी रँक मिळाली होती. चंद्रावर सुशांत सिंह राजपूतला जायचे होते. त्यासाठी त्याने काही वर्षांपूर्वी चंद्रावरील सी ऑफ मस्कॉवी रिजनमधील जमिनीचा एक तुकडाही खरेदी केला होता. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली चंद्रावरील ही जागा दाखवली होती.

View this post on Instagram

The My Side Of The Moon 🌓 #dreams

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on


सुशांतने त्या फोटोला ‘द माय साइड ऑफ मून #dreams’ असे कॅप्शन दिले होते. सुशांतची हीच ती चंद्रावरील जागा. चंद्रावरील आपल्या या ठिकाणी नासाच्या मोहिमेअंतर्गत जाण्याची इच्छाही सुशांतने व्यक्त केली होती. एका चित्रपटात सुशांत अंतराळवीराची भूमिका करणार होता. त्याने यासाठी नासामध्ये ट्रेनिंगही घेतले होते. पण काही कारणास्तव हा प्रोजेक्ट सुरूच झाला नाही. नासाच्या 2024 च्या चांद्रमोहिमेत सुशांतला जायचे होते आणि त्याने त्यादृष्टीने तयारी देखील सुरू केली होती.

पण सुशांतने आपले हे स्वप्न पूर्ण करण्याआधीच एक्झिट घेतली. बांद्रा येथील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. या प्रकरणी पुढचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याच्या घरातून मेडिकल रिपोर्ट मिळाले आहेत. त्यानुसार डिप्रेशनवर तो उपचार घेत होता.

Leave a Comment