असा होता सुशांतचा टीव्ही ते रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास


बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक एक्झिटमुळे त्याच्या चाहत्यांना आणि हिंदी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. दरम्यान छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुशांतने सुरूवात केली होती. नंतर हे नाव रुपेरी पडद्यावरही गाजवले होते.

स्टार प्लसवरील किस देश मे है दिल मेरा या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुशांतने सुरू केली होती. पण त्याला एका मराठी व्यक्तिरेखेमुळे खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर झी टीव्हीवर 2009 साली आलेल्या पवित्र रिश्तामध्ये त्याने मानव देशमुख ही व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे सुशांत घरोघरी पोहोचला होता. जरा नचके दिखा, झलक दिखला जा या रिऍलिटी शोमध्येही सुशांतने भाग घेतला होता.

सुशांतने 2011 साली काय पो छे या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्याने या चित्रपटात इशांत भटच्ची भुमिका साकारली होती. सुशांतचा पहिलाच चित्रपट हिट झाला होता आणि त्याच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली होती. सुशांतने त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके सारखे हिट चित्रपटही दिले.

त्याने मोठ्या स्क्रीनवर धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती. एम एस धोनी या चित्रपटामुळे सुशांत प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्यानंतर आलेल्या राबता, केदारनाथ हे चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर आलेल्या सोनचिडिया या चित्रपटाला जरी यश मिळाले नसले तरी चित्रपटातील सुशांतच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती.

छिछोरे आणि ड्राईव्ह या चित्रपटांनाही फार यश मिळाले नाही. सुशांत सिंहचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा ठरला. हा चित्रपट आधी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परत तो मे महिन्यात ढकलण्यात आला. पण कोरोना संकटामुळे परत त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

Leave a Comment