किमच्या निर्दयी बहिणीने दक्षिण कोरियाला दिली हल्ल्याची धमकी


प्योंगयांग : दक्षिण कोरियाविरूद्ध लष्करी कारवाईची धमकी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याची बहीण किम यो जोंग हिने दिली आहे. दक्षिण कोरियासोबत सीमेवर बिघडलेले संबंध यावरुन किम यो हिने हल्लाबोल केला आहे. दक्षिण कोरिया उत्तर कोरियाविरुद्ध निषेध व्यक्त करणारे बलून (फुगे) रोखण्यात असमर्थ ठरल्यामुळे किम यो ही प्रचंड संतापलेली असल्यामुळेच ही हल्ल्याची धमकी तिने दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये किम योच्या या धमकीनंतर खळबळ उडाली असल्यामुळेच दक्षिण कोरियाने आपल्या सुरक्षा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक देखील बोलावली आहे.

दक्षिण कोरियाचा ‘शत्रू’ असा उल्लेख करत किम यो जोंग हिने आपल्या जुन्या धमकीचा पुनरुच्चार केला आहे. ती म्हणाली की, दक्षिण कोरिया सीमेवरील निरुपयोगी संपर्क कार्यालय लवकरच बंद पडेल. त्याचबरोबर दक्षिण कोरियाविरूद्ध कारवाई करायची की नाही हे मी उत्तर कोरियाच्या लष्करी नेत्यांवर सोपावते. तसेच सर्वोच्च नेता, आमचा पक्ष आणि देश यांनी दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून, मी शस्त्रास्त्र विभागाच्या प्रभारीला पुढील कृती म्हणून शत्रूविरूद्ध जोरदार कारवाई करण्याचे निर्देश देते. उत्तर कोरियामध्ये तिचा केवढा प्रभाव आहे हेच किम यो जोंगची ही धमकी दाखवून देते. उत्तर कोरियामधील सर्वात शक्तिशाली आणि भाऊ किम जोंग उनची सर्वात विश्वासू समजली जाणारी किम यो जोंग ही दक्षिण कोरियासोबतची संबंध प्रभारी आहे.

कोरोनामुळे जानेवारीपासून उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संपर्क कार्यालय बंद आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्टाध्यक्ष मून जेई इन यांच्यात झालेल्या तीन शिखर चर्चेनंतर या संपर्क कार्यालयांची २०१८ साली स्थापना झाली होती. दरम्यान, हुकूमशहाची बहिणी किम यो हिने दक्षिण कोरियाला धमकी दिली की होती, जर त्यांनी आपला विरोध थांबविला नाही तर ती दोन्ही देशांमधील लष्करी करार रद्द करेल.

आता दक्षिण कोरियामध्ये उत्तर कोरियाच्या या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज बोलविण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा संचालक चुंग यूई योंग सध्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. किम यो जोंग यांच्या मागणीसमोर यापूर्वी झुकून दक्षिण कोरियाने बलूनद्वारे (फुगे) होणारे निषेध रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याची घोषणा केली होती.

Leave a Comment