जगभरातील कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 20 हजारांवर पोहचला असून देशात मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 11 हजार 929 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 तासात कोरोनामुळे सर्वाधिक 311 बळी गेले आहेत. देशात सलग चौथ्या दिवशी 300 पेक्षा जास्त बळी गेले असून काल दिवसभरात 8 हजार 50 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

देशातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 62 हजार 379 झाली आहे. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 50.59 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 49 हजार 348 रुग्ण आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 195 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वेगाने वाढताना दिसत आहे. भारताने कोरोना बाधितांच्या संख्येत शुक्रवारी ब्रिटनला मागे सोडल्यामुळे जगभरातील कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझील, रूसनंतर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment