सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती


मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. पवित्र रिश्ता सारख्या लोकप्रिय मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सुशांतने त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवत असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली होती. काही तरुणींच्या गळ्यातला ताईत देखील सुशांत बनला होता. पण त्याच्या या अशा अचानक एक्झिटमुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. त्यामुळे सुशांतने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुशांत आत्महत्येसंदर्भात मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही मिनिटापूर्वीच ही घटना घडली असून सुशांतने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा त्याचे काही मित्र त्याच्या घरी होते. दरम्यान पोलिसांना सुशांतच्या घरातून काही वैद्यकीय कागदपत्रे मिळाली असून तो काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सुशांतसिंह राजपूत हा तणावात असल्याने त्याच्यावर उपचारही सुरू होते. पण त्यादरम्यानच त्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलीस त्याच्या घरी असून पंचनामा सुरू आहे.

Leave a Comment