संजय राऊत यांच्या आपल्या मित्राला अनोख्या शब्दांत शुभेच्छा


मुंबई – आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असून विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच अनोख्या शब्दांत आपल्या मित्राला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


महसूल वाढीसाठी वाईन शॉप सुरू करा, या राज ठाकरेंच्या मागणीवर संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती. पण आता त्याच राऊत यांनी आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..जय महाराष्ट्र,’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

Leave a Comment