कोरोनाच्या लक्षणात आणखी दोन नव्या लक्षणांची भर


नवी दिल्ली : कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा आरोग्य मंत्रालयाकडून समावेश करण्यात आला असून कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये अचानक वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती नष्ट होणे या लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनाची नवी लक्षणे तोंडाची चव जाणे, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणे ही असल्याचे सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात एका विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषत: कोरोना संबंधित ही लक्षणे नाहीत. कारण व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमता फ्लू, ताप किंवा इन्फ्लूएन्झामुळेही (शीतज्वर) बिघडते. पण कोरोनाची ही प्राथमिक लक्षणे असू शकतात. ही लक्षणे आढळल्यास त्यानुसार, त्वरित उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते.

कोरोना व्हायरसची कोरडा खोकला, ताप, श्वसनविषयक समस्या, अशी सुरुवातीची लक्षणे आहेत. त्याचबरोबर सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, घसा सुजणे, घशाला सूज येणे, घसा खवखवणे, अतिसार, धाप लागणे, कफ, थकवा येणे ही देखील कोरोनाची लक्षण असू शकतात.

Leave a Comment