9 वर्षांच्या मुलाने बनविली हँड वॉशिंग मशिन, मिळाला राष्ट्रपती पुरस्कार

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. केनियाच्या एका 9 वर्षीय मुलाने भन्नाट कल्पना वापरून हँड वॉशिंग मशीन तयार केली होती. आता या मुलाचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. केनियाचे राष्ट्रपती उहुरू केनियाट्टा यांच्या हस्ते 68 जणांना सन्मानित केले आहे. यामध्ये ही मशिन तयार करणारा स्टिफेन वामुकोटा हा सर्वात तरूण आहे.

स्टिफेनने ही सेमी ऑटोमॅटिक मशीन लाकूड, खिळे आणि वॉटर टँकरच्या मदतीने बनवली आहे. या मशिनला दोन पेडल्स आहेत. एक साबण बाहेर येण्यासाठी आणि एक पाणी बाहेर येण्यासाठी. या मशिनद्वारे कशाला स्पर्श न करता व्यक्तीला हात धुवता येतात.

स्टिफेनच्या या क्रिएटिव्हिटीसाठी सोशल मीडियावर देखील त्याचे कौतुक केले जात आहे. त्याचे वडील जेम्स यांनी सांगितले की, व्हायरसबाबत बातम्या वाचल्यावर स्टिफेनला या मशीनविषयी कल्पना सुचली. राष्ट्रपतींनी जेव्हा या व्हायरसपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुण्यास सांगितले होते.  तेव्हा त्याने या मशिनविषयी मला सांगितले.

Leave a Comment