रेल्वे स्टेशनवर कोरोनाशी लढण्यास मदत करणार रोबॉट ‘कॅप्टन अर्जुन’

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरू झाली आहे. परराज्यात अडकलेले नागरिक रेल्वेने आपल्या घरी जात असल्याने रेल्वे स्थानकांवर गर्दी होत आहे. अशा स्थिती कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे येथे रेल्वे सुरक्षा दलाने एक खास रोबॉट कॅप्टन अर्जुन लाँच केला आहे. हा रोबॉट रेल्वे प्रवाशांचे स्क्रिनिंग करेल व असामाजिक तत्वांवर लक्ष देखील ठेवेल. कोरोना स्क्रिनिंग आणि सर्वेलन्सच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.

Image Credited – scoopwhoop

रेल्वेचे महासंचालक संजीव मित्तल हे रेल्वे सुरक्षा दलाच्या या निर्मितीचे कौतुक करत म्हणाले की, रोबॉट कॅप्टन अर्जुन कोणत्याही संसर्गापासून प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांचे रक्षण करेल. याच्या देखरेखेखाली प्रणाली चांगली सुरक्षा प्रदान करेल.

कॅप्टन अर्जुन थर्मल स्क्रिनिंग करतो व तापमानाला डिजिटल डिस्प्ले पॅनेलमध्ये 0.5 सेंकदाच्या रिस्पॉन्स टाईमसोबत रेकॉर्ड करतो. तापमान अधिक असल्यास एक ऑटोमॅटिक अलार्म वाजू लागतो. कॅप्टन अर्जुन ऑडिओ आणि व्हिडीओद्वारे टू-वे कम्युनिकेशन मोडने सुसज्ज आहे व तो स्थानिक भाषा देखील बोलतो. स्पीकर्सच्या मदतीने हा रोबॉट लोकांना कोरोनाबाबत जागृक करू शकतो. कॅप्टन अर्जुन सेंसरच्या मदतीने सॅनिटायझर आणि मास्क देखील देतो. रोबॉटमध्ये बॅटरी बॅकअपसोबत फ्लोर सॅनिटायझेशनची सुविधा देखील आहे. याच्यात लागलेल्या चाकांमुळे हा रोबॉट कोठेही जाऊ शकतो.

Leave a Comment