सलग सातव्या दिवशी झाली पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

अनलॉक 1 ला सुरूवात झाल्यापासून दररोज इंधनाच्या किंमतीत वाढ होत आहे. सलग सातव्या दिवशी आणि पेट्रोल-डिझेल महागले आहे. आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या प्रती लीटर किंमतीत 59-61 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 50-60 पैसे वाढ झाली आहे. स्थानिक विक्री कराच्या आधारावर प्रत्येक राज्यात किंमती वेगवेगळ्या आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड एनालिसिस सेलच्या आकड्यांनुसार, मे महिन्यात इंधनाची एकूण विक्री 1.465 कोटी टन होती. जी एप्रिल पेक्षा 47.4 टक्के अधिक आहे. मात्र मागील वर्षाच्या याच कालावधी पेक्षा 23.3 टक्के कमी आहे.

दिल्लीत पेट्रोलची प्रती लीटर किंमत 74.57 रुपयांवरून 75.16 रुपये तर डिझेलची किंमत 72.81 रुपयांवरून 73.39 रुपये झाली आहे. मुंबईत पेट्रोल 82.10 आणि डिझेल 72.03 रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्ता आणि चेन्नईत पेट्रोल क्रमशः 77.05 आणि 78.99 लीटर आहे. तर प्रती लीटर डिझेलची किंमत क्रमशः 69.23 आणि 71.64 रुपये आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमत तुम्ही एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार तुम्हाला आरएसपी आणि शहराचा कोड लिहून 9224992249 या नंबरवर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे जो आयओसीएलच्या वेबसाईटवर मिळेल.

Leave a Comment