जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी देत कोरोना व्हायरस महामारीचे अप्रत्यक्ष भीषण परिणाम पाहायला मिळू शकता असे म्हटले आहे. संघटनेने म्हटले की कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अधिक नुकसान होऊ शकते. याचा सर्वाधिक अप्रत्यक्ष परिणाम महिला, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर होईल. याच्यांवर पडणारा अप्रत्यक्ष परिणाम हा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही अधिक भयानक असेल.
कोरोना महामारीच्या आत आणखी एक महामारी, डब्ल्यूएचओची चेतावणी

डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल टेड्रोस घेब्रियेसुस म्हणाले की, अनेक ठिकाणी महामारीमुळे आरोग्य प्रणालीवर दवाब वाढत आहे. यामुळे प्रेग्नेंसी संदर्भात महिलांच्या मृत्यूचा धोका वाढू शकतो. यूनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडचे एग्झिक्टिव्ह डायरेक्टर नतालिया कनेम या परिस्थिती विषयी म्हणाल्या की, महामारीच्या आत आणखी एक महामारी निर्माण झाली आहे.

कनेम यांच्यानुसार प्रत्येक 6 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे 4.7 कोटी महिला कंट्रासेप्शनची सुविधा गमावतील. यामुळे 6 महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये इच्छा नसताना 70 लाख बाळांचा जन्म होईल. इंटर पार्लियामेंट्री यूनियनचे अध्यक्ष ग्रॅबिएला कुवस बॅरन म्हणाले की महामारीमुळे 4 ते 6 कोटी मुलांना धोका आहे. अनेक देशांमध्ये शाळा देखील मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत.