अमेरिकन अंतराळ संस्था नासाने ह्युमन स्पेसफ्लाईटच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे. नासाचे प्रमुख जिम ब्रिडेन्स्टाईन यांनी याबाबतची माहिती देताना ट्विटरवर सांगितले की, नासाच्या ह्युमन एक्स्पोरेशन अँड ऑपरेशन्स मिशन डायरेक्टोरेटच्या प्रमुखपदी कॅथी ल्युड्रेस यांची नेमणूक करण्यात आली आहे. कॅथी यांनी कर्मशियल क्रू आणि कमर्शियल कार्गो प्रोगामचे काम व्यवस्थितरित्या हाताळले व 2024 साली मनूष्याला चंद्रावर पाठवण्यासाठी एचईओचे नेतृत्व करण्यासाठी त्या योग्य व्यक्ती आहेत.
कॅथी ल्युड्रेस बनल्या नासाच्या ह्युमन स्पेसफ्लाईटच्या पहिल्या महिला प्रमूख
ल्युड्रेस यांनी 1992 ला नासामध्ये रुजू झाल्या होत्या. मागील महिन्यात स्पेसएक्सद्वारे दोन अंतराळावीरांना अंतराळात पाठवण्यात आले होते. या योजनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्या स्पेसएक्स, बोईंग आणि इतर कंपन्यांमध्ये गेली अनेक वर्ष स्पेस कॅप्यूलची चाचणी करणाऱ्या प्रमुखपदी होत्या. या कंपन्या मनुष्याला अंतराळात पाठवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रॉकेटसाठी नासासोबत काम करतात.
दरम्यान, 2024 साली एका महिलेसह दोन अंतराळवीरांना एसएलएस रॉकेट आणि ओरिऑन कॅप्सुलच्या मदतीने अंतराळात पाठवण्याची नासाची योजना आहे.