मुंबई पोलीस दल होणार मॉडर्न, आता सेगवेवरून घालणार गस्त

कोरोना संकटाच्या काळात पोलीस दल सर्वात पुढे येऊन कार्य करत आहे. या दलाला अधिकाधिक आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने वारंवार प्रयत्न केले जात असतात. याचेच एक उदाहरण मुंबई पोलीस दलात पाहण्यास मिळाले. मुंबईच्या अनेक भागात आता पोलीस कार, बाईक अथवा चालत नाही तर आता थेट सेगवेद्वारे (सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर) गस्त घालणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचे उद्घाटन करत 50 सेगवे मुंबई पोलिसांना दिले आहेत.

अनिल देशमुख उद्घाटनावेळी म्हणाले की, सध्या 10 सेगवे वरळी, 5 सेगवे नरिमन पाँईंट येथे तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय बांद्रा, जुहू आणि वर्सोवा भागात देखील याच्या वापराविषयी विचार केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकार पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रतिबद्ध असल्याचे देखील ते म्हणाले.

जे पोलीस कर्मचारी सेगवेद्वारे गस्त घालतील त्यांच्या मास्कवर पब्लिक अनाउंसमेंट सिस्टम देखील लावलेली असेल. ज्याद्वारे कर्मचारी लोकांशी बोलू शकतील. याशिवाय काही भागात ड्रोन्सद्वारे देखील लक्ष ठेवले जाणार आहे.

Leave a Comment