हे आहेत मुकेश अंबानींचे राईट हँड, फेसबुकसह इतर कंपन्यांसोबत लाखो-करोडोचे करार करण्यामागचे मुख्य सुत्रधार

रिलायन्स जिओ काही दिवसांपुर्वीच फेसबुकसह जगभरातील 8 कंपन्यांसोबत करार केल्याने विशेष चर्चेत आले होते. हे करार करण्यामागे एक व्यक्ती होती ती म्हणजे मनोज मोदी. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ते मोठे डीलर म्हणून ओळखले जातात. मुकेश अंबानींच्या सर्वच करारांमध्ये मनोज मोदी यांची महत्त्वाची भूमिका असते. पडद्यामागे राहणाऱ्या मनोज मोदींना मुकेश अंबानी यांचे राईट हँड मानले जाते. रिलायन्सच्या सुत्रांनुसार फेसबुकला जिओमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार करणारे मनोज मोदीच होते. खास गोष्ट म्हणजे मनोज मोदी आणि अंबानी हे कॉलेज मित्र आहेत.

Image Credited – tv9bharatvarsh

कच्चा तेलाच्या किंमती कमी होत असल्याने ऑइल मार्केटमध्ये अस्थिरता आहे. अशा स्थितीमध्ये मुकेश अंबानी आपल्या ग्रुपला पेट्रोकेमिकल्सच्या ऐवजी इंटरनेट टेक्नोलॉजी कंनपी म्हणून स्थापित करू पाहत आहेत. त्यांना यासाठी मनोज मोदी मदत करत आहेत. आतापर्यंत रिलायन्स जिओमध्ये फेसबुक, विस्टा, जनरल अटलांटिकसह अनेक दिग्गज कंपन्यांनी 97 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Image credited – livemint

याविषयी मोदी म्हणाले की, मी कोणताही करार करत नाही. मी रिलायन्समध्ये केवल अंतर्गत लोकांशीच डील करतो. त्यांना कोचिंग देतो व गाईड करतो. रिलायन्सच्या वर्किंग स्टाईलबद्दल मोदी म्हणाले की, आमचा सिद्धांत खूप सरळ आहे. जोपर्यंत तुम्ही व्यवसायाशी जोडले जाऊन पैसे कमवण्याच्या स्थितीमध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्या व्यवसायाला कायमस्वरूपी म्हणू शकत नाही.

चार स्टार्टअप्सचे प्रमुख असलेल्या व्यक्तीने सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कोणत्याही करारामध्ये मनोज मोदींची भूमिका महत्त्वाची असते. जर एखाद्या करारात त्यांच्यासोबत मिटिंग निश्चित झाल्यास, याचा अर्थ फायनल अप्रूवल मिळणार आहे. जनसत्ताच्या वृत्तानुसार, फेसबुकसोबतच्या करारामध्ये आकाश अंबानीची भूमिका महत्त्वाची होती. सर्वच करारामध्ये त्यांचे मत महत्त्वाचे होते. आकाश अंबानी आणि मनोज मोदी नेहमीच मोठ्या करारामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.

Leave a Comment