आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनावरील उपचारासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी औषधांसंबंधित माहिती


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणारी वाढ ही चिंताजनक असून महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा चाचणीपूर्ण प्रयोग करण्यात येत होता.


दरम्यान कोरोनावरील उपचारपद्धतीत आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी औषधांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. टास्कफोर्स ऑन आयुष फॉर कोविड-19 यांच्याकडून ही औषधे घेतानाच्या आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ट्विटरद्वारे या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वसामान्यांपर्यंत शेअर केल्या आहेत.

महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या उपचारासाठी Remdesivirची 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार आहे. दरम्यान या प्रभावशाली औषधाच्या क्लिनिकल ट्रायल राज्यात सुरू झाल्या असून राज्यातील 14 सरकारी वैद्यकीय कॉलेज आणि 4 मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांना हे औषध देण्यात येत आहे.

Leave a Comment