सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक लवकरच आपल्या युजर्ससाठी खास फीचर आणणार आहे. फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर विकिपीडिया सपोर्ट देण्याची तयारी करत आहे. फेसबुकवर सर्च केल्यानंतर आपल्या फ्रेंड, प्रोफाइल, पोस्ट, व्हिडीओ सारखे रिझल्ट्स मिळत असतात. मात्र लवकरच विकिपीडिया पेजचे लिंक दिसणार आहे. नवीन अपडेटमध्ये फेसबुकवर एखादी व्यक्ती, चित्रपट-सीरिजविषयी सर्च केल्यानंतर गुगलप्रमाणे विकिपीडिया रिझल्ट देखील मिळेल.
फेसबुकच्या नव्या फीचरमध्ये दिसणार विकिपीडिया लिंक

फेसबुकच्या या फीचरसाठी फेसबुक नवीन सर्च बार जारी करणार नाही. सध्याच्या सर्च बारमध्येच युजर्सला हा पर्याय मिळेल. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे नाव सर्च केल्यावर खालील बाजूला एक नॉलेज बॉक्स उघडेल ज्यात विकिपीडियाची लिंक असेल. हे गुगलवर सर्च करण्यासारखेच असेल. सध्या फेसबुक या फीचरचे टेस्टिंग करत आहे.
या फीचरच्या काही मर्यादा देखील आहेत. जसे की फेसबुकचे नॉलेज बॉक्स प्रसिद्ध व्यक्तींबाबत माहिती तर देते, मात्र चित्रपट-सीरिजबाबत माहिती देत नाही.