कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आता क्रिकेटवर देखील याचे परिणाम दिसत आहेत. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सध्या परिस्थितीमधील क्रिकेटविषयी मत व्यक्त केले आहे. गावस्कर म्हणाले की, आता क्रिकेट खेळणे अवघड होणार आहे. मात्र मी फलंदाज-क्षेत्ररक्षकांना मास्क घालून खेळताना पाहू शकत नाही. ते आज तकशी बोलत होते.
क्रिकेटपटूंना मास्क घालून खेळताना नाही पाहू शकणार – सुनील गावस्कर
गावस्कर म्हणाले की, मैदानावर आता कदाचित खेळाडूंचे सेलिब्रेशन पाहण्यास मिळणार नाही. टीम एकत्र येऊन आनंद साजरा करण्यात एक वेगळीच मजा होती. फलंदाजाने चौकार मारला तरी गलव्हस दिसणार नाही. आता क्रिकेट पुर्णपणे सॅनिटायझ होईल. येणाऱ्या काळात बॉलबाबत प्रत्येक खेळाडूच्या मनात भिती असेल. मात्र सामन्याआधी प्रत्येकाची टेस्ट केली जाईल. ज्यामुळे विश्वास निर्माण होईल की जर खेळाडूला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याला बाहेर ठेवले जाईल. त्याच्या जागी रिप्लेसमेंट येऊ शकते.
गावस्कर म्हणाले की, क्रिकेटपटूंना मास्क घालून खेळताना मी पाहू शकणार नाही. हेलमेटमध्ये फलंदाजाला ओळखणे अवघड होते. त्यामुळे टी-शर्टवरील नंबरने ओळखले जाते. मास्क आला तर अवघड होईल. ऑक्टोंबरपर्यंत क्रिकेट खेळणे अवघड असल्याचे देखील ते म्हणाले.