कोरोना व्हायरस महामारीच्या काळात लोक प्रवासासाठी आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करत आहेत. याच प्राश्वभूमीवर आता केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने (एचयूए) राज्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सायकलप्रमाणे बिगर-मोटार चलित वाहनांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने सार्वजनिक वाहतूक प्रणालीत कॅशलेस तंत्रज्ञान देखील लागू करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने सांगितले की सायकल चालकांसाठी न्यूयॉर्कमध्ये 65 किमी नवीन लेन बनवली आहे. ऑकलँडने 10 टक्के रस्ते मोटार वाहनांसाठी बंद केले आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सायकल ठरू शकते प्रमुख अस्त्र, केंद्राने राज्यांना दिला सल्ला

याच प्रमाणे राज्य आणि मेट्रो रेल्वे कंपन्यांना सल्ला देताना मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सांगितले की, बिगर-मोटार चलित वाहनांना संपुर्ण भारतात प्रोत्साहन द्यायला हवे व याचा पुन्हा वापर करण्यास सांगावे. सरकारी एडवाइजरीमध्ये म्हटले की, अधिकांश शहरातील प्रवास 5 किमीच्या आतच असतात. कोरोनाच्या स्थितीत बिगर-मोटार चलित वाहनांना वापरणे अधिक योग्य आहे. यात कमी खर्च, कमी मानव संसाधनाची आवश्यकता असते.
मंत्रालयाने म्हटले की, सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी संसर्गाच्या प्रसारावर अंकुश लावला जावा. यासाठी स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंग पाळले पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीत भीम, फोन पे, गुगल पे अशा कॅशेलस सिस्टमचा वापर केल्याने मानवी संपर्क कमी होईल.