या देशात आता लोकांना पाहता येणार हे दुर्मिळ ‘बेबी ड्रॅगन’

स्लोवेनियातील पोस्टोना गुहेतील मत्सालयात ठेवलेला बेबी ड्रॅगन नावाने ओळखला जाणारा दुर्मिळ जलचर जीव आता पर्यटकांना पाहता येणार आहे. दररोज 30 पर्यटक हा दुर्मिळ जलचर जीव पाहू शकतील. हा दुर्मिळ जीव 100 वर्ष जगतो व दशकातून एकदाच पिल्लांना जन्म देतो. पोस्टोना गुहेने सांगितले की, 21 पिल्लांपैकी 3 पिल्लांना सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. 2016 पासून आम्ही त्यांच्याकडे बारीक लक्ष देऊन होतो.

2016 साली गुहेतील एका ओल्मसने (पालीसारखा प्राणी) 60 अंडी दिली होती. यातील 21 पैकी तीन पिल्लं याच अंड्यातून बाहेर पडलेली आहेत. या जीवाच्या जगण्याची पद्धत आणि आधिक माहिती गोळा करण्यासाठी गुहेच्या प्रशासनाने पर्यटकांपासून लांब गुहेच्या लॅब्रोटरीमध्ये ठेवले होते.

हा जीव आंधळा असून, याची 13.5 इंचपर्यंत वाढ होऊ शकते. याला 4 छोटे पाय देखील आहेत. या जीवाच्या पारदर्शक गुलाबी त्वचेतून आत शरीरातील भाग देखील दिसतात. हा जीव विना अन्न-पाण्याचे एक दशक जिंवत राहू शकतो. मूळ बाल्कन गुहेच्या नदीत सापडलेला ही जीव जगप्रसिद्ध पोस्टोना गुहेत ठेवला आहे. या गुहेला हजारो नागरिक भेट देत असल्याने आता पर्यटकांना हा बेबी ड्रॅगन पाहता येणार आहे.

Leave a Comment