दहावी, बारावीच्या निकाला संदर्भात शिक्षण मंडळ सचिवांचे आवाहन


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्यामुळे सोशल मीडियावरुन निकालासंदर्भांत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिवांनी केले आहे.


महामंडळाच्या अधिकृत इमेलद्वारे, महामंडळाच्या संकेतस्थळावरुन तसेच प्रसिद्ध माध्यमांद्वारे सर्वांना फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (पुणे) सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Comment