अमेरिकेत 218 वर्षात पहिल्यांदाच ही भारतीय महिला सैन्य अकादमीमधून पदवीधर होणार

अमेरिकेत एक भारतीय वंशाची महिला इतिहास रचणार आहे. सेंकड लेफ्टिनेंट अनमोल नारंग वेस्ट प्वाइंट स्थित अमेरिकन सैन्य अ‍ॅकॅडमीमधून पदवी घेणारी पहिली शीख महिला बनून आज इतिहास रचणार आहे. नारंगचा जन्म देखील अमेरिकेतच झाला आहे. तिने जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतली आणि त्यानंतर वेस्ट पॉईंट येथून अणू इंजिनिअरिगमध्ये आज पदवी मिळवणार आहे.

नारंगने म्हटले की, मी यासाठी उत्सुक असून, वेस्ट पॉईंट येथून पदवी घेण्याचे माजे स्वप्न पुर्ण होणार आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जॉर्जियामध्ये माझ्या समुदायाने मदत केली ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नारंग ओकलाहोमा येथे बेसिक ऑफिसर लीडरशीप कोर्स पुर्ण करेल व त्यानंतर जानेवारीमध्ये जपानच्या ओकिनावा येथे पहिली पोस्टिंग असेल.

अमेरिकेच्या सैन्य अकादमीच्या 218 वर्षांत असे पहिल्यांदाच होणार आहे की बिगर-अमेरिकन महिला एवढ्या मोठ्या पदावर पोहचणार आहे. अनमोल नारंगने अमेरिकन सैन्याच्या इतिहासातील बॅरिकेडिंग तोडले आहे. नारंगची खास गोष्ट म्हणजे तिचे आजोबा देखील भारतीय सैन्यात कार्यरत होते. तिने आपल्या आजोबांकडून प्रेरणा घेऊनच सैन्यात पाऊल ठेवले.

Leave a Comment