ओडिशामध्ये 500 वर्ष जुने भगवान विष्णूचे मंदिर अचानक नदीतून आले वरती

ओडिशाच्या नयागढ येथील पद्मावती नदीतून अचानक 500 वर्ष जुने भगवान विष्णूचे मंदिर वरती आल्याने आजुबाजूचे लोक देखील हैराण झाले आहेत. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांगितले की या मंदिराला त्यांनीच शोधले आहे. या मंदिराची बनावट पाहून हे 15व्या अथवा 16व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. या मंदिरात गोपीनाथाचा प्रतिमा होती.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमनुसार, ओडिशाच्या नयागढ स्थित बैद्येश्वर जवळील महानदीची शाखा असलेल्या पद्मावती नदीच्या मध्यभागी मंदिराचे कळस दिसत आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ दीपक कुमार नायक यांनी सांगितले की, पद्मावती नदी किनाऱ्यावर गाव वसलेली व अनेक मंदिरे असताना त्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. नदीत ज्या मंदिराचा कळस दिसत आहे, ते 60 फूट उंच आहे. हे मंदिर 15व्या-16व्या शकताली असण्याची शक्यता आहे.

ज्या भागात हे मंदिर सापडले आहे, त्या भागाला सतपताना म्हणतात. येथे एकसोबत 7 गावे वसली होती. सात गावातील लोक या मंदिरातच भगवान विष्णूची पुजा करत असे. जवळपास 150 वर्षांपुर्वी नदीने दिशा बदलल्याने आलेल्या पुरात मंदिरासह 7 गावे देखील बुडाली. ही घटना 19व्या शतकातील असेल. पाण्याचा प्रवाह पाहून गावकऱ्यांनी मंदिरातील मुर्ती काढून घेतली होती.

स्थानिक लोकांनी सांगितले की, पद्मावती गावाच्या आजुबाजूला 22 मंदिरे होती. नदीने दिशा बदलल्याने सर्व मंदिर पाण्यात बुडालेली आहेत. जवळपास 150 वर्षांनी पुन्हा एकदा भगवान गोपीनाथ देव यांच्या मंदिराचा कळस दिसला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ या ऐतिहासिक जागेची कागदपत्रे जमा करत आहे.

Leave a Comment