फोन क्रॅश करणाऱ्या फोटोचे उलगडले रहस्य

फोटो साभार डब्ल्यूवायआरके

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता. हा फोटो जितका सुंदर होता तितकाच तो काही स्मार्टफोन्ससाठी खतरनाक ठरला होता. हा फोटो स्मार्टफोनचा त्यातही सॅमसंग स्मार्टफोनचा वॉलपेपर बनवू नका कारण त्यामुळे फोन क्रॅश होत असल्याचे एका व्यक्तीने सर्वप्रथम ट्विटर वर @ universeice हँडल वरून शेअर केले होते. इतकेच नाही तर या व्यक्तीचा फोन क्रॅश झाल्याचे व कुणी हा फोटो पाठविला तरी दुर्लक्ष करण्याचे आवाहनही केले गेले होते.

विशेष म्हणजे अनेकांनी हा फोटो वॉलपेपर म्हणून घेतल्यावर खरोखरच त्यांच्या फोनचे काम बंद पडले होते. मिडिया रिपोर्टनुसार हा फोटो अमेरिकेच्या सॅन डीअॅगो येथे राहणारे वैज्ञानिक आणि हौशी फोटोग्राफर गौरव अग्रवाल यांनी २०१९ मध्ये ते परिवारासह मोंटाना ग्लेशिअर नॅशनल पार्क मधील सेंट मेरी लेक वर गेले असताना त्यांच्या डीएसएलआर कॅमेऱ्याने काढला होता आणि एडीट करून फ्लीकर वर अपलोड केला होता. त्यावेळी त्यांना हा फोटो अनेकांचे स्मार्टफोन क्रॅश करेल याची सुतराम कल्पना नव्हती.

झाले असे की गौरव यांनी फोटो एडीट करताना कलर फॉर्मेट बदलून आयफोनला योग्य अश्या फॉर्मेटची निवड केली होती. अँड्राईड फोन मध्ये स्टँडर्ड रेड, ग्रीन व ब्ल्यू असे फोर्मेट आहे. अँड्राईड १० पर्यंत असेच फोर्मेट आहे. त्यामुळे बदललेल्या फोर्मेट प्रमाणे फोन कलर ओळखू शकत नाही आणि हँग होऊ लागतो. अँड्राईड ११ कलर स्पेस सिस्टीम स्वतः कन्व्हर्ट करू शकतो. त्या फोनना ही अडचण आली नाही.

याचा अर्थ असा की या फोटो मध्ये काहीही रहस्य नाही, काहीही दोष नाही. दोष असेल तर तो तंत्रज्ञानाच आहे.

Leave a Comment