देशाची परकीय चलन गंगाजळी प्रथमच ५०० अब्ज डॉलर्सवर

फोटो साभार सीएनबीसी टीव्ही

करोना महामारीमध्ये भारतातील संक्रमित संख्या ४ लाखावर गेल्याने या यादीत भारत चार नंबरवर पोहोचला आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत एक चांगली बातमी आहे. इतिहासात प्रथमच भारताची परकीय चलन गंगाजळी ५०० अब्ज डॉलर्सवर गेली असून या बाबतीत भारत जगात तीन नंबरचा देश बनला आहे. भारताच्या पुढे या यादीत चीन १ नंबरवर तर जपान दोन नंबर वर आहे.

गेल्या आठवड्यात भारताने रशियाला या यादीत मागे टाकले आहे. ५ जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचे विदेशी चलन ८.२२ अब्ज डॉलर्सने वाढून ५०१. ७० अब्ज डॉलर्स झाले. विश्लेषणात असे समोर आले आहे की लॉकडाऊन काळात क्रूड तेल आयात, सोने आयात, खाद्य तेल आयात कमी झाली. त्याचबरोबर परकीय गुंतवणुकीत वाढ झाली. रिलायंसने सात आठवड्यात १ लाख कोटीची परकीय गुंतवणूक मिळविली त्याच्याही फायदा देशाला झाला.

लॉक डाऊन काळात क्रूड किमती घसरल्या त्याचाही मोठा फायदा झाला. जेव्हा क्रूड तेलाची किंमत १ डॉलरने कमी होते तेव्हा भारताचे आयात बिल २९०० कोटी रुपयांनी कमी होते असे सांगितले जाते. या काळात सोने दर चढे राहिल्याने सोन्याची मागणी घटली आणि त्यामुळे आयात कमी करावी लागली त्याचाही फायदा परकीय चलन गंगाजळी वाढण्यासाठी झाला असे दिसून आले आहे. गत् वर्षी एप्रिल मध्ये १०१ टन सोने आयात केले गेले होते ते प्रमाण यंदा एकदम कमी झाले आहे.

Leave a Comment