आयएमची पासिंग आउट परेड संपन्न

फोटो साभार झी न्यूज

शनिवारी सकाळी देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीची पासिंग आउट परेड सोशल डीस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून पार पडली. त्यात ४२३ कॅडेट सामील झाले. पैकी ३३३ भारतीय थलसेनेत अधिकारी म्हणून रुजू झाले तर अन्य ९ देशातून आलेले ९० कॅडेट त्यांच्या देशाच्या सेनेत अधिकारी बनले. आयएमएच्या ८७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच कॅडेटच्या खांद्यांवर सेनेचे स्टार लावण्यासाठी त्यांचे पालक उपस्थित राहू शकले नाहीत. करोना साथीमुळे यंदा हा सोहळा अतिशय साधेपणाने आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून, मास्क लावून साजरा केला गेला.

यावेळी लष्करप्रमुख मुकुंद नरवणे म्हणाले, आमचे हे नवे अधिकारी त्यांच्या कुटुंबाचे नाव उज्वल करतीलच पण कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहेत. कुटुंबापासून दूर असणे अवघड आहे याची कल्पना आहे. नरवणे कॅडेटच्या पालकांना उद्देशून म्हणाले, आजपर्यंत ही तुमची मुले होती आता ती आमची आहेत. यावेळी स्वोर्ड ऑफ ऑनर आकार धिल्लन या कॅडेटला देण्यात आली.

परेड सुरु असतना हलका पाउस येत होता मात्र परेड सुरूच राहिली. पासिंग आउट परेड सुरु असताना कधीही पाउस आला तरी परेड थांबविली जात नाही. परेड थांबविणे अथवा कॅन्सल करणे किंवा बंद जागेत घेणे हा आयएमए मध्ये अपशकून मानला जातो असे समजते.

Leave a Comment