फुलराणीची मेहनत सुरु, चीनी अॅप वापरल्याने चाहत्यांनी झापले

फोटो साभार झी न्यूज

करोना लॉकडाऊन मधून देश हळूहळू बाहेर पडू लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. परिणामी इतके दिवस ठप्प असलेल्या क्रीडा क्षेत्रात हालचाल सुरु झाली आहे. खेळाडू लॉकडाऊन पूर्वीचा फिटनेस परत मिळविण्यासाठी मेहनत करू लागले आहेत. हलक्या फुलक्या व्यायामाकडून आता खेळाडू कसून मेहनत करायला तयार झाले आहेत. भारताला पाहिले बॅडमिंटन ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी फुलराणी सायना नेहवाल याला अपवाद नाही.

साईना नवीन सिझनसाठी कसून सराव करते आहे. आणि त्याचबरोबर वडील हरवीरसिंह यांच्याकडूनही व्यायाम करून घेते आहे. साईनाने या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती पुश अप काढताना दिसते आहे. कॅप्शनमध्ये पुश अप काढण्यात अवघड काय असे विचारते आहे आणि त्याचवेळी वडील पुशअप काढत असल्याचा व्हिडीओ शेअर करते आहे. हा व्हिडीओ सायनाने टिकटॉकवर शेअर केला आहे.

सायनाचे चाहते यामुळे थोडे नाराज झाले असून त्यांनी साईनाला टिकटॉक चीनी अॅप आहे असे सांगून तिला देशभक्तीपर उपदेशाचे डोस पाजले आहेत शिवाय हे अॅप डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे. याला मात्र साईनाने काहीही उत्तर दिलेले नाही.

Leave a Comment