फेसबुकच्या मार्गावर ट्विटर, लवकरच इमोजीद्वारे तुम्ही देऊ शकाल ‘रिएक्शन’

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर देखील हळूहळू फेसबुकच्या मार्गावर जाताना दिसत आहे. नुकतेच ट्विटरने फ्लिट्स हे फीचर युजर्ससाठी आणले आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकमधील स्टोरीज या फीचर सारखेच आहे. आता ट्विटर फेसबुकप्रमाणे रिएक्शन इमोजीची टेस्टिंग करत आहे. याची माहिती टिप्स्टर जेन मनचून वोंगने दिली आहे. मात्र अन्य रिपोर्टमध्ये ट्विटरने असाच प्रयोग 2015 मध्ये देखील केल्याचे म्हटले आहे.

जेन मनचुन वोंगने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात फेसबुकप्रमाणेच विविध रिएक्शन असणारे इमोजीचा पर्याय दिसत आहे. फेसबुकवर पोस्टवर प्रतिक्रिया देण्यासाठी अशा इमोजींचा पर्याय मिळतो. मात्र ट्विटवर हे फीचर कधी येणार याची अद्याप माहिती नाही.

दरम्यान, ट्विटरने नुकतेच फ्लिट्स हे फीचर लाँच केले असून, जे फेसबुकच्या स्टेट्सप्रमाणेच आहे. या फीचरद्वारे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करता येईल व 24 तासांनी आपोआप गायब होईल.

Leave a Comment