मध्य प्रदेशच्या एका शेतकऱ्याने प्रयोग म्हणून काळ्या गव्हाची शेती केली होती. त्यांचा हा प्रयोग एवढा यशस्वी झाला की आता या स्पेशल गव्हाच्या खरेदीसाठी देशभरातून मागणी येत आहे. विनोद चौहान हे शेतकरी मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात राहतात. त्यांनी युट्यूबवर राजस्थानच्या एका शेतकऱ्याचा काळ्या गव्हाची शेती करतानाचा व्हिडीओ पाहिला होता. हे गहू सामान्य गव्हापेक्षा अधिक पौष्टिक होते.
प्रयोग म्हणून उगवले होते काळे गहू, आता करतो आहे लाखोंची कमाई

याबाबत शोध घेतल्यावर त्यांना समजले की पंजाबच्या नॅशनल अग्री-फूड बायोटेक्नोलॉजी इंस्टिट्यूटच्या डॉ. मोनिका गर्ग यांनी याचा शोधला लावला आहे. या गव्हांमध्ये 60 टक्के अधिक आयर्नचे प्रमाण असते. सोबतच प्रोटीन, स्टार्चसारखे दुसरे पोषक तत्व देखील असतात. हे शुगर फ्री देखील आहेत.

हे गहू पौष्टिक असल्याने याची मागणी देखील अधिक आहे. विनोद यांनी राजस्थानच्या शेतकऱ्याकडून 200 रुपये किलो यानुसार 500 किलो काळ्या गव्हाची बियाणे मागवले. ही बियाणे त्यांनी 8 एकरमध्ये लावले व 2000 किलो गव्हाचे उत्पादन केले. लोकांना याची माहिती मिळताच आता उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यातून त्यांना ऑर्डर येत आहे. आता ते याद्वारे मोठी कमाई करत आहेत.