देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांच्या उंबरठ्यावर


मुंबई – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः कहर माजवला आहे. त्यातच देशातील पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होत आहे. देशभरात मागील २४ तासांत १० हजार ९५६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ४१ हजार ८४२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर १ लाख ४७ हजार १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ८ हजार ४९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ झाला असून मृतांचा आकडा ३ हजार ५९०वर पोहोचला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ५६१ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४६ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत कोरोनाचे १५४० नवे रुग्ण – १५४० नवे रुग्ण मुंबईमध्ये गुरुवारी सापडल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९८५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९५२ वर पोहोचला आहे. तसेच गुरुवारी ५१६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २७ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Leave a Comment