कोरोनाग्रस्तांना दिलासा, आता आरोग्य विम्यात होणार टेलिमेडिसीनचा समावेश

कोरोनाच्या रुग्णांना आरोग्य विम्याबाबत दिलासा देणारा निर्णय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) घेतला आहे. आयआरडीएआयने टेलिमेडिसीनला आरोग्य विम्यात घेण्यास सांगितले आहे. इरडाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या उपचाराचा आरोग्य विमा कव्हरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता यात टेलिमेडिसीनचा समावेश केल्याने कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Image Credited – CNBC

टेलिमेडिसीनचा अर्थ रुग्ण घरी बसूनच फोन अथवा अन्य माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला घेतो. कोरोनाच्या काळात याची अधिक गरज असून, अधिकांश रुग्ण आता ऑनलाईन अथवा फोनच्या मदतीने डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत. या सेवेसाठी शुल्क देखील रुग्ण ऑनलाईन पद्धतीनेच देतात.

Image Credited – The Cureatr Blog

इरडाने विमा कंपन्यांना सांगितले की, टेलिमेडिसीनचा देखील आरोग्य विम्यात समावेश करण्यात यावा. टेलिमेडिसीनला परवानगी देण्याची तरतूद क्लेम सेटलमेंटचा भाग असणे गरजेचे आहे व याला वेगळे भरण्याची गरज पडणार नाही. टेलिमेडिसीनची सेवा 25 मार्चला जारी टेलिमेडिसीन प्रॅक्टिस दिशानिर्देशांनुसार असायला हवी. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात फोन व ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला घेणाऱ्यांना मदत मिळेल.

Leave a Comment