आता नो बॉलसारखाच वाईड बॉलवर देखील मिळणार फ्री-हीट


जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. पण आता आयसीसीने यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी क्रिकेटचा सराव सुरु करण्यासाठी काही दिवसांपूर्वी नियम आखून दिल्यानंतर आयसीसीने लॉकडाउन पश्चात क्रिकेटचे सामने सुरु करण्यासाठीही काही नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यात चेंडूला चकाकी आणण्यासाठी गोलंदाजांना लाळेचा वापर न करणे, स्थानिक पंच आणि सामनाधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य, बदली खेळाडू, डीआरएसच्या संख्येत असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणाऱ्या बिग बॅश लिग स्पर्धेच्या आयोजकांनीही नियमांमध्ये बदल केला आहे. कोणत्याही क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकीत करणारे हे नियम आहेत. यामधील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आता बिग बॅश लिगमध्ये वाईड बॉलवरही फ्री हीट दिली जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार याआधी फक्त नो-बॉलवर फ्री-हीट मिळायची. याव्यतिरिक्त बिग बॅश लिगमध्ये पहिल्या १० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला बोनस गूण, परिस्थितीनुसार १० षटकानंतर पर्यायी खेळाडूला मैदानात उतरवणे असे काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.

क्रिकेट लॉकडाउन काळात पुन्हा सुरु होईल तेव्हा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्व खेळाडूंना काळजी घ्यावी लागणार आहे. प्रेक्षकांविनाच सुरुवातीचे काही महिने सामने खेळवण्याकडे आयोजकांचा भर असणार आहे, त्यामुळे स्पर्धा अधिकाधिक रंगतदार व्हावी यासाठी असे नवीन नियम लागू करण्यात येत आहेत.

Leave a Comment