महापालिकेचा आदेश; यापुढे मुंबईतील खासगी लॅबमध्ये होणार नाही कोरोनाची चाचणी


मुंबई – पुढील चार आठवडयांसाठी मुंबईतील सर्वात मोठया खासगी लॅबवर कोरोनाच्या चाचण्या करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे मुंबईतील कोरोना चाचण्यांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. मुंबई सध्याच्या घडीला देशातील कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट बनले असून खास लॅबकडून कोरोना चाचणीचे रिपोर्ट उशिराने मिळत असल्यामुळे बृह्नमुंबई महानगर पालिकेने ही बंदीची कारवाई केली आहे.

या बंदी संदर्भातील आदेशात महानगरपालिकेने कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळण्यात उशीर होत असल्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे कठिण होऊन बसते. त्यामुळे उपचाराला विलंब होतो. त्यामुळे वेळप्रसंगी काही रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागल्याचा उल्लेख केला आहे. रिपोर्ट द्यायला विलंब होत असल्याचे या खासगी लॅबने मान्य केले आहे. पण कोरोनाची लागण त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा झाल्याचे त्यामागे एक कारण असल्याचे सांगितले. रिपोर्टना विलंब होण्याचे प्रमाण खूप कमी असल्याचे या लॅबचा दावा आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

Leave a Comment