कौतुकास्पद : या महिलेने रात्रभर रिक्षा चालवून कोरोनामुक्त व्यक्तीला पोहचवले घरी, मुख्यमंत्र्यांनी दिले लाखोंचे इनाम

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा संकटाच्या काळात लोक एकमेंकांची मदत करत आहे. मणिपूरमध्ये एका महिला रिक्षाचालकाने रात्रभर गाडी चालवून 140 किमी दूरचा प्रवास करत कोरोनातून बरे झालेल्या एका व्यक्तीला घरी सोडल्याची माहिती समोर आली होती. महिला रिक्षाचालकाच्या या कामासाठी त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या महिलेला 1,10,000 रुपये इनाम म्हणून दिले आहेत.

Image Credited – scoopwhoop

इंफालच्या राजकीय जवाहरलाल नेहरू इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये महिलेवर उपचार सुरू होते. आजारातून बरे झालेल्या महिलेला घरी जायचे होते. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्याने रुग्णवाहिकेने नकार दिला. जेव्हा रिक्षाचालक लाइबी ओइनम यांना याची माहिती मिळाली त्यावेळी त्या महिलेला घरी सोडण्यासाठी त्वरित तयार झाल्या.

लाइबी यांनी 31 मे च्या रात्री इंफालपासून 140 किमीचा प्रवासाला सुरूवात केली. महिलेला तिच्या घरी कमजोंग जिल्ह्यात सोडण्यासाठी 8 तास लागले. या कामासाठी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत लाइबी यांचे कौतुक केले.

लाइबी या मणिपूरच्या पहिल्या महिला रिक्षाचालक आहेत. त्या इंफालच्या पेंगई बाजारात आपली आई आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांच्यावर ऑटो ड्राईव्हर नावाने डॉक्युमेंट्री देखील बनलेली आहे.

Leave a Comment