याला म्हणतात नशीब! ऑनलाईन मागवली होती 300 रुपयांची वस्तू, आले 19 हजारांचे हेडफोन्स

ऑनलाईन शॉपिंग करणे सध्या सोपे झाले असले तरी अनेकदा वस्तू मागवलेली दुसरी असते व डिलिव्हरीमध्ये दुसरीच वस्तू आल्याच्या घटना घडत असतात. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतम रेगे नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव शेअर करत लिहिले की, त्यांनी अ‍ॅमेझॉनवरून 300 रुपये किंमतीचे स्कीन लोशन मागवले होते. मात्र कंपनीने त्यांना चक्क 19,000 रुपयांचे बोसचे एअरबड्स पाठवले. सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

खास गोष्ट म्हणजे त्यांनी अ‍ॅमेझॉनला याबाबतची कल्पना दिली असता कंपनीने त्यांना ही ऑर्डर नॉन रिफंडेबल असल्याचे सांगत महागडे एअरबड्स त्यांनाच ठेवायला सांगितले. त्यांना स्कीन लोशनचे देखील रिफंड मिळाले. रेगे यांनी या ऑर्डरचे पोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टला आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देत त्यांना सुद्धा असाच अनुभव आल्याचे सांगितले.

Leave a Comment