लंडनच्या या प्रसिद्ध रस्त्याला देणार गुरू नानक यांचे नाव

ब्रिटनची राजधानी लंडन येथील एका रस्त्याला गुरू नानक मार्ग नाव देण्याची तयारी सुरू आहे. या रस्त्याचे सध्या नाव ब्रिटिश सैन्य कमांडर हेनरी हेवलॉकच्या नावावरून आहे. हेवलॉकने भारतातील 1857 च्या उठाव मोडून काढला होता. अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर सुरू झालेले वर्णभेद विरोध प्रदर्शन लंडनमध्ये अद्याप सुरू आहे.

जगभरात सुरू असलेल्या ब्लॅक लाईव्हस मॅटर्स आंदोलन पाहता लंडनचे महापौर सादिक खान यांनी शहरात असलेले पुतळे आणि सार्वजनिक ठिकाणांच्या नावांचा पुन्हा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. ही नावे ब्रिटिश वसाहतवादाची आठवण करून देतात. याच पार्श्वभुमीवर हेवलॉक रस्त्याचे नाव बदलून शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांच्या नावावरून ठेवण्याचा विचार सुरू आहे.

साउथहॉल येथे मोठ्या प्रमाणात शीख समुदाय राहतो. हेवलॉक रोडवरील श्री गुरू सिंह सभा गुरुद्वारा हा भारताच्या बाहेरील जगातील सर्वात मोठा गुरुद्वारा असल्याचे मानले जाते.  त्यामुळे येथील रस्त्याला गुरू नानक यांचे नाव देण्याचा विचार सुरू आहे.

Leave a Comment