अमेरिकेत भारतीय डॉक्टरची कमाल, कोरोनाग्रस्त महिलेचे केले यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण

अमेरिकेत भारतीय वंशाचे डॉक्टर अंकित भारत यांच्या नेतृत्वाखालील टीमने मोठी कामगिरी केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे एका महिलेच्या फुफ्फुसांना गंभीर नुकसान पोहचले होते. अंकित भारत यांच्या नेतृत्वाखाली टीमने या महिलेच्या फुफ्फुसांचे प्रत्यारोपण केले आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात करण्यात आलेली ही अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

अंकित भारत यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे झाला आहे. कोरोनामुळे महिलेच्या शरीरातील महत्त्वपुर्ण अंग खराब झाल्यानंतर अंकित यांनी त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली. शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन हॉस्पिटलने सांगितले की, ज्या महिलेवर शस्त्रक्रिया केली त्यांचे वय 20 ते 25 वर्ष होते.

नॉर्थवेस्टर्न मेडिसिन फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रमाचे थोरेसिक सर्जरी आणि सर्जिकल संचालक अंकित भारत म्हणाले की, फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करणे महिलेला जिंवत ठेवण्यासाठी एकमेव पर्याय होता. माझे हे आतापर्यंतचे सर्वात कठीण प्रत्यारोपण होते. ही खरच एक आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती.

Leave a Comment