खराब क्वालिटीचे पीपीई किट, लढण्यासाठी हे भारतीय दांपत्य गेले ब्रिटन सरकारविरोधात न्यायालयात

भारतीय वंशाच्या डॉक्टर दांपत्याने कोरोना व्हायरस महामारीच्या काळात डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) च्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ब्रिटन सरकारविरूद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. निशांत जोशी आणि त्यांच्या पत्नी मीनल विज हे सरकार विरोधात लंडनच्या उच्च न्यायालयात पोहचले आहेत. या दांपत्याने ब्रिटनच्या आरोग्य आणि सामाजिक देखभाल मंत्रालय व सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडे प्रश्नांची उत्तरे मागत एप्रिल महिन्यात कायदेशीर कारवाई सुरू केली होती.

त्यांनी सांगितले की, या प्रकरणात आम्हाला कायदेशीर लढाई लढायची नव्हती. आम्हाला महामारीच्या काळात लोकांचे प्राण वाचवण्यावर लक्ष द्यायचे आहे. मात्र आमच्या समस्यांना सरकारने उत्तरे देणे टाळल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. त्यांचे प्रतिनिधित्व करणारी कंपनी बिंडमांसने सांगितले की न्यायालयीन आढावा घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सांगण्यात आले आहे की पीपीई संदर्भातील सरकारी मार्गदर्शक तत्व आणि डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये फरक आहे.

या डॉक्टर दांपत्याने आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना पीपीई किटचा वापर करणे आणि काही पीपीई किट पुन्हा वापरण्यासंदर्भात न्यायालयात आव्हान दिले आहे. दांपत्याचे म्हणणे आहे की सरकारची दिशानिर्देश तत्व डब्ल्यूएचओपेक्षा वेगळी आहेत व यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण आणि मानवाधिकारांचे उल्लंघन आहे.

Leave a Comment