धक्कादायक! बनावट आरोग्य सेतू सारख्या अ‍ॅपद्वारे हॅकर्स करत आहेत युजर्सचे फोन कॉल रेकॉर्ड

कोरोना संकटाच्या काळात कॉन्टॅक्ट ट्रॅकिंगसाठी युजर्स विविध अ‍ॅपचा वापर करत आहे. आता हॅकर कोरोना संसर्ग ट्रॅक करण्यासाठी तयार केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप्सचे बनावट व्हर्जनद्वारे युजर्सच्या डिव्हाईसवर हल्ला करत आहेत. ऐनोमली थ्रेट रिसर्चच्या रिपोर्टनुसार भारतासह जगातील 10 देशांच्या युजर्सचा डेटा धोक्यात आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की मालवेअर फोनचा पुर्णपणे एक्सेस घेतो व फोन कॉल्सला देखील रेकॉर्ड करतो.

हॅकर्सने सरकारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतूचे देखील बनावट व्हर्जन तयार केल्याचे समोर आले होते. याशिवाय छत्तीसगडच्या एका अ‍ॅपचे देखील बनावट व्हर्जन बनवण्यात आले आहे. अँड्राईड हेडलाईन्सच्या रिपोर्टनुसार जे 12 बनावट अ‍ॅप्स युजर्सच्या डिव्हाईसला नुकसान पोहचवत आहेत त्यातील अर्धे ट्रोजन आहेत. डिव्हाईसला नुकसान पोहचवण्यासाठी दुसऱ्या व्हायरसला एक अ‍ॅडवेअर आहे. यातील  चार अ‍ॅप एन्युबस आणि स्पायनोटवर डेव्हलप करण्यात आले आहे. सर्वाधिक धोका भारत, ब्राझील, रशिया आणि इंडोनिशियाच्या युजर्सला आहे.

स्पायनोट व्हायरस डिव्हाईसमधून एसएमएस, लोकेशन डेटा आणि कॉन्टॅक्टची चोरी करते. तर एन्युबस सिस्टम संपुर्ण माहितीला एक्सेस करते. चिंतेची बाब म्हणजे हे मालवेअर युजर्सच्या फोन कॉल्सला देखील रेकॉर्ड करतात. युजर्सच्या फोनमध्ये स्पायनोट शिरल्यास ते युजर्सच्या नंबरवरून दुसऱ्यांना फोन कॉल, मेसेज देखील पाठवू शकतो. स्पायनोट इंडोनिशिया आणि भारतातील युजर्सला लक्ष्य बनवत आहे.

Leave a Comment