वर्क फ्रॉम होम करता करता या इंजिनिअरने संपुर्ण गावाला देखील केले सॅनिटायझ

वर्क फ्रॉम होम करताना वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा हे तामिळनाडूच्या एका इंजिनिअरकडून शिकायला हवे. इंजिनिअर असलेला 40 वर्षीय कृष्णकुमार मदुरैच्या विरुधुनानगर येथील रहिवासी आहे. त्याने वर्क फ्रॉम होम करताना त्याच्या संपुर्ण गावालाच सॅनिटायझ अर्थात निर्जंतुकीकरण केले आहे. असे करण्यासाठी त्याने खास उपकरणे देखील बनवली.

कृष्णकुमार एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो. इंजिनिअर असण्यासोबतच तो शेतकरी देखील आहे. सध्या कोरोनामुळे तो घरूनच काम करत आहे. अशा स्थितीमध्ये त्याने मिळालेला मोकळ्या वेळेचा इतरांच्या मदतीसाठी उपयोग करण्याचे ठरवले.

Image Credited – scoopwhoop

कोरोना संकटात TAFE नावाच्या ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने त्यांना नांगरणीची मोफत सुविधा दिली. मात्र त्यावेळी त्याच्या पेरली गावात एक कोरोनाग्रस्त आढळला होता. यावेळी त्याने पाहिले की लोक डिसइनफेक्शनसाठी हँडपंपचा वापर करत आहेत. यानंतर त्याने ट्रॅक्टर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोलणी करून एका बूम स्प्रेयर ट्रॅक्टरद्वारे संपुर्ण गाव सॅनिटायझ केले. बूम स्प्रयेर ट्रॅक्टरचा वापर पीकांवर किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी होतो.

Image Credited – scoopwhoop

जवळ दोन आठवड्यांपासून कृष्णकुमार गावाला सॅनिटायझ करण्याच्या कामाशी जोडलेला आहे. त्याने सांगितले की, स्थानिक लोक यासाठी पाणी आणि केमिकल देत आहे. स्प्रयेर अर्ध्या तासात 200 लीटर फवारणी करते. वर्क फ्रॉम होम करता करता कृष्णकुमार समाजसेवा देखील करत आहे.

Leave a Comment