युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पत्नीला झाली कोरोनाची लागण

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात संपुर्ण जग अडकले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्सकी आणि त्यांच्या दोन मुलांचा कोरोना रिपोर्ट मात्र नेगेटिव्ह आला आहे.

ओलेना झेलेन्सका यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, आज मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. अनपेक्षित बातमी. कारण खासकरून मी आणि माझे कुटुंब मास्क, हातमोजे आणि कमी संपर्कात येणे या गोष्टींचे पालन करत आहोत. त्यांनी सांगितले की, आता बरे वाटत आहे व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले नव्हते. मात्र पती आणि मुलांपासून लांब आयसोलेशनमध्ये राहत होते.

दरम्यान, युक्रेनमध्ये आतापर्यंत जवळपास 30 हजार कोरोनाग्रस्त आढळले असून, 870 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment