आज तंत्रज्ञानाच्या काळात दररोज नवनवीन गोष्टींची निर्मिती होत असते. आता चीनच्या एका उद्योजकांना चक्क 2 लोक आरामशीर उड्डाण घेऊ शकतील असे मिनी हेलिकॉप्टर तयार केले आहे. या हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी ड्रोनची मदत घेण्यात आली आहे. यात चार मोटार लावण्यात असून, प्रत्येक मोटार 19 हजार वॉट पॉवर देते.
कमालच! या पठ्ठ्याने चक्क ड्रोन वापरून बनविले 2 सीटर मिनी हेलिकॉप्टर, नाव ठेवले ‘octocopter’

या मिनी हेलिकॉप्टरचे नाव ऑक्टोकॉप्टर ठेवण्यात आले आहे. हे 120 किलो वजन घेऊन उडण्यास सक्षम आहे. याच्या चारही बाजूला असे इलेक्ट्रिक डिव्हाईस आहेत. जे याची दिशा, गती आणि उंचीवर नियंत्रण ठेवतात. सोबतच मोटर्स सुरू राहण्यास मदत करतात. हे पुर्ण ऑक्टोकॉप्टर 170 सेंटीमीटर म्हणजेच 5.57 फूट लांब आहे. याच्या निर्मितीसाठी कार्बन फायबरचा उपयोग करण्यात आला.
This “Octocopter” could be hovering over you soon. Its owner hopes the mini-helicopter can help police patrols and rescue operations pic.twitter.com/rwBMyYN1cx
— SCMP News (@SCMPNews) June 11, 2020
उड्डाण घेताना हे 150 किलो नेगेटिव्ह लिफ्ट निर्माण करते. म्हणजेच उड्डाण घेताना हवेत याचे वजन 150 किलोपर्यंत पोहचते. याला बनवणारे डेली झाओ म्हणाले की, याचे पार्ट्स चीनमध्येच बनलेले आहेत. कोठे जायचे असेल तर याच्यातील जीपीएस सिस्टमची मदत देखील घेता येते.

त्याने सांगितले की, याच्या जेथे जायचे आहे ते स्थान निश्चित केल्यावर हे आपोआप तुम्हाला तेथे सोडते. तुम्हाला केवळ याचे उड्डाण घ्यावे लागेल. दिशा हेलिकॉप्टर स्वतः ठरवते. या मशीनद्वारे शहरात पोलीस पेट्रोलिंगमध्ये मदत मिळेल. सोबतच इमर्जेंसीच्या वेळी बचाव कार्यात मदत होईल.